aarogya.com
Voices from the field
Donate Us
Forthcoming Events
Activities and Meetings
Achievements
Home arrow Singapore - Sports and Epilepsy
Print

Singapore - Sports and Epilepsy

सिंगापूर मध्ये भरलेल्या जागतिक एपिलेप्सी परिषदेत एक व्याख्यान ’स्पोर्टस ऍन्ड एपिलेप्सी’ या विषयावर होत. तेव्हा आधी वाटलं की एपिलेप्सीमुळे शारिरीक व्यायाम, खेळ यापासून मुलं कशी वंचित रहातात हयावर इथे बोललं जाईल. कारण आपल्या समाजात एपिलेप्सी असलेल्या मुलांचं खेळणं म्हणजे पालकांच्या नजरेसमोर ते जितकं खेळू शकतील तितपत असतं. पण माझा हा अंदाज साफ़ चुकीचा ठरला. कारण टाळयांच्या कडकडातात पुढे आली ती मारिऑन क्लिंगनेट जागतिक सायकल पटू. सहा वेळा ’टूर दी फ़्रान्स’ ही जगप्रसिध्द सायकल रेस जिंकलेली. दोन वेळा ऑलिपिंक मध्ये मेडल मिळवलेली, आणि जगभरातल्या इतर अजून एकशेऎंशी सायकल स्पर्धा जिंकलेली! मारिऑनच आश्चर्य म्हणजे हे सगळं तिनी एपिलेप्सीचा आजार असताना मिळवलं आहे.

वयाच्या बाविसाव्या वर्षी मारिऑन क्लिंगनेटला एपिलेप्सीचा पहिला झटका आला, तेव्हा तिला आणि तिच्या कुटुंबियाना धक्काच बसला. तेव्हापासून, जिम इन्स्ट्रक्टर असलेल्या मारिऑनवर खूप बंधन आली. मुख्य म्हणजे ती आता वहानही चालवू शकणार नव्हती. पण डॉक्टरांनी तिला सायकल चालवायची मुभा मात्र दिली होती. त्यामुळे थोडं स्थिरस्थावर झाल्यावर मारिऑननी कामच्या ठिकाणी सायकलनी जायला सुरवात केली. आता कारच्या ऎवजी सायकल वापरायला लागल्यावर हळूहळू तिला सायकलच जास्त आवडायला लागली. इतकी, कि तिनी रोज तीस किलोमिटर सायकलिंग करणं सुरू केलं.

हे सगळं करत असताना तिला एपिलेप्सीचे झटके नियमित येत होते. पण तिच्या हे ही लक्षात येत होतं की सायकलिंग हा आता तिचा ’छंद’ आणि ’ध्येय’ बनल्यामुळे ती एपिलेप्सीचं दु:ख करुन घेत नव्हती. मारिऑनच्या सायकल टीम इतकी प्रगती होत गेली की ती अमेरिकेतल्या सायकल मधे सतत वरचढ ठरायला लागली.

पण जेव्हा १९९० मधे ’टूर दी फ़्रान्स’ हया जगप्रसिध्द सायकल रेस साठी अमेरिकेतली सायकल टीम तयार होत होती, त्यातून मात्र मारिऑनला वगळलं गेल! आणि निवड करणान्यांनी कारण सांगितलं ते तिच्या एपिलेप्सीचं परंतु त्यातूनही खचून न जाता अमेरिकन आणि फ़्रेंच असं दुहेरी नागरिकत्व असलेल्या मारिऑननी फ़्रान्सकडे धाव घेतली. तिथे सराव केला, आणि फ़्रेंच टीम मधे तिची निवड सुध्दा झाली. आता तर मारिऑननी जिद्द इतकी वाढली होती, की कसून सराव १९९० मधे ती ’टूर दी फ़्रान्स’ या स्पर्धेत पहिली आली! आणि इतक्यावरच न थांबता ’टूर दी फ़्रान्स’ तिनी सलग सहा वर्ष गोल मेडल मिळवलं!

सिंगापूरच्या कॉन्फ़रन्स मधे बोलताना मारिऑन सांगत होती कि ती हे संगळ करू शकली ते केवळ तिच्या एपिलेप्सी हया आजारामुळे! जर तिला हा त्रास सुरु झाला नसता तर ती सर्वसामान्य व्यक्ती प्रमाणे जगली असती. पण एपिलेप्सी मुळे आलेल्या बंधनांमुळे तिला सायकलिंगचा छंद लागला आणि नवी दिशा दिसली.

मारिऑननी आता स्पर्धेत भाग घेण्यातून निवृत्ती घेतली आहे, पण ती हे सायकल टीमच्या ’कोच’चं काम करते. जगभरातल्या एपिलेप्सी सेंटर्सना भेट देते. फ़िरनेसचं महत्तव सांगते. तिला अजूनही फ़ीटस येतात, पण तिच्या म्हणण्याप्रमाणे एपिलेप्सीची ती कायम आभारी असते. त्यामुळेच तर तिला नवा मार्ग दिसला ना!

यशोदा वाकणकर